कामतवाडीत आ.अनिल पाटलांच्या हस्ते विविध विकासकामांचे झाले भूमिपूजन

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)-विधानसभा मतदारसंघातील कामतवाडी ता.अमळनेर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने आमदार निधीतून 13 लक्ष निधीतून सभा मंडप बांधणे आणि डी. पी.सी.अंतर्गत 11.15 लक्ष निधींतुन अंगणवाडी बांधकाम करणे या दोन कामांचे भूमीपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले,तत्पूर्वी गावात आगमन झाल्यानंतर आमदारांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला,सत्काराला उत्तर देताना आमदारांनी गावात ज्या ज्या समस्या असतील किंवा जी विकासकामे आवश्यक असतील ती नक्की देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही देत मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी मांडला.
या प्रसंगी सरपंच गोरख शंभु पाटील, उपसरपंच हुकूमचंद किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र भागवत पाटील, राजाराम पाटील, योगेश पाटील, ईश्वर पाटील, भगवान पाटील, माजी सरपंच भगवान पितांबर पाटील, पुंडलिक पाटील, आनंदराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जनार्धन पाटील, खेमराज पाटील, दिपक पाटील, विजय पाटील तसेच ग्रामस्थ मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम