आजचे राशीभविष्य, बुधवार १४ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | बुधवार १४ सप्टेंबर २०२२ | मेष – आवश्यक तेथेच बढाया मारा. भौतिक विकास होईल. एखादा नवीन करार होण्याची शक्यता. आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ – कामातील नवीन योजनांवर भर द्यावा. कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. मनोकामना पूर्णत्वास जाण्याचे योग.

मिथुन – करमणुकीच्या साधनात जास्त वेळ घालवाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा कराल. मानसिक शांतता व समाधान लाभेल. एखादे काम पूर्ण दिवस घेईल.

कर्क – आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवाल. सृजनात्मक कार्यातील आवड वाढेल. हातातील कामात यश येईल. सहकारी संपूर्ण सहकार्य करतील.

सिंह – मुलांबरोबर वेळ आनंदात जाईल. दिनक्रम व्यस्त राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वरिष्ठ अधिकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल.

कन्या – कामातील नवीन संधी शोधाव्यात. व्यावहारिक सावधानता बाळगावी. वाणी संयमित असावी. प्रेमातील व्यक्तींना नवीन उत्साह लाभेल.

तूळ – नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. एखादा जुना वाद संपुष्टात येईल.

वृश्चिक – अति तिखट पदार्थ टाळा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. नोकरदार वर्गाला दिलासादायक बातमी मिळेल.

धनू – कामात जोखीम पत्करावी लागेल. नेहमीच्या कामात काहीसा बदल करून पाहावा. नवीन संधी हेरता आली पाहिजे.

मकर – घरातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कुंभ – संमिश्र घटनांचा दिवस. आहारावर नियंत्रण ठेवावे. कामे उरकण्याची घाई कराल.

मीन – व्यापारी वर्गाला सुखकारक दिवस. सामाजिक स्तरावर मान वाढेल. संयमाने समोरील समस्येचे निराकरण करू शकाल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम