चहा पिण्यापूर्वी पाणी पिण का आहे महत्वाच ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ नोव्हेबर २०२३

देशातील प्रत्येक व्यक्तीला चहा खूप महत्वाचा आहे. अनेक लोक चहाला पसंती देत नाही पण जे काही लोक सकाळी चहा पीत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे. चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिणं. कदाचित तुम्हालाही ही सवय असू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पिऊ नये यासाठी काही लोकं पाणी पिणं पसंत करतात. अशावेळी प्रश्न असा उपस्थित होतो की, जे लोकं चहा-कॉफी पिण्यापूर्वी पाणी पितात त्यांच्या शरीरात एसिड तयार होतं का?

मुळात चहा आणि कॉफी दोन्ही गोष्टी तुमच्या पोटासाठी हानिकारक असतात. चहा आणि कॉफी पोटात गेल्यानंतर त्यांचं एसिडमध्ये रूपांतर होतं. चहाची पीएच वॅल्यू 6 आहे तर कॉफीची पीएच वॅल्यू 5 आहे.

यावेळी अल्सर आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. पण जर कॉफी किंवा चहा पिण्यापूर्वी तुम्ही पाणी पित असला तर त्यामुळे हा धोका काही प्रमाणात कमी होतो. पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो जो चहा आणि कॉफीमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. दात न घासता किंवा रिकाम्या पोटी चहा पिणं खूप हानिकारक मानलं जातं. हे पोटात ऍसिड तयार करण्याचं काम करतं. त्यामुळे दातही खराब होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बर्‍याच प्रमाणात, यामुळे दात किडणं देखील वाढतं. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्ही डिहायड्रेशनला बळी पडू शकता.

चहा पिण्याच्या किती वेळ अगोदर पाणी प्यायलं पाहिजे?
चहा किंवा कॉफीचं सेवन करण्यापूर्वी पाणी पिणे शरीरासाठी चांगलं असतं. अशा स्थितीत चहा पिण्याच्या 10-15 मिनिटं अगोदर पाणी प्यायलं पाहिजे. जेणेकरून शरीरात तयार होणारं आम्लीय परिणाम कमी होतात. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. चहा पिण्याच्या १० ते १५ मिनिटे आधी पाणी प्यायल्याने शरीरावर चहाचा आम्लीय प्रभाव कमी होतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम