देशात नव्या व्हायरसने दोघांचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | देशातील केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोझिकोडमध्ये सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर 7 ग्रामपंचायतींना कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना मास्क घालणे बंधनकारक आहे. फक्त औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत उघडण्यास परवानगी आहे.

बुधवारी राज्य सरकारने विधानसभेत सांगितले की, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) ची टीम आज केरळमध्ये येणार आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये एक लॅब बांधली जाईल, ज्यामध्ये NIV टीम निपाह चाचणी आणि वटवाघळांचे सर्वेक्षण करेल.
मंगळवारी रात्री केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी निपाह विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च (ICMR) सोबतही चर्चा केली आहे आणि राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम