आ.एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांना आज दुपारी जळगावात हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत.

मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांना उपचारासाठी आणले जाणार असल्याची माहिती आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास एकनाथ खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे खडसेंना उपचारासाठी मुंबईत आणणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना याबाबात सूचना दिल्या आहेत. माजी मंत्री आदरणीय आमदार श्री. एकनाथराव खडसे यांना गेले दोन दिवस अस्वस्थ वाटतं असल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून सावधगिरी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. काळजीचे कारण नाही…

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम