‘उद्धवजी, ‘मालमत्ताकांड’ काढायला लावू नका’; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल !
बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळ शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित येवून गेले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
‘जी-२०’ परिषदेच्यानिमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भेटले. भारतीय माणूस म्हणून त्यांना भेटल्याचा आनंद वाटला. या भेटीत त्यांनी ब्रिटनला या म्हणून सांगितले. दरवर्षी लंडनला येतात आणि संपत्ती घेतात. थंड हवा खातात आणि भारतात परतात. त्याची तुम्हाला सविस्तर माहिती देतो, असेही सुनक यांनी सांगितले. त्यामुळे आमच्या भेटीवर टीका करणाऱ्यांनी जास्त बोलायला लावू नका. अन्यथा ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाचोऱ्यात केला. नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा पद्धतशीरपणे हिशेब घेतला.
दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी सुनक-एकनाथ शिंदे भेटीवर टीका केली होती. सुनक यांच्याशी शिंदे काय बोलले असतील, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मंगळवारी पाचोऱ्यात शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेवर भाष्य केले. ‘पाटणकर काढा’ घेण्याची वेळ येऊ देऊ नका, हा इशारा देणाऱ्या शिंदेंनी ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. वर्षभरात महायुतीच्या शासनाने विकासाचा धडाका लावला आहे. त्यामुळे काही जणांना ‘पोटदुखी’चा आजार जडला आहे. त्यामुळे लवकरच ‘डॉक्टर, आपल्या दारी’ कार्यक्रम राबविला जाणार असल्याची खोचक टीका शिंदे यांनी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अनिल पाटील यांच्यासह भाजप, सेनेचे आमदार यावेळी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम