दुचाकी आदळून अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील पुलानजीकच ट्रकवर दुचाकी आदळल्याने एका अनोळखी इसमाचा जागेवर दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सामोरे आली आहे. सदरप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी मयताची ओळख पाटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील पुलाखाली एमएच १८ बीजी ९७४० हा १४ टायरचा ट्रक उभा होता. त्यावेळी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीझेड ६०३६) वरील अनोळखी तरूण हा दुचाकीने जात असता भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे या अपघातात अनोळखी तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम