केंद्रीय गृहमंत्री शहांचा औरंगाबाद दौरा रद्द ; उपमुख्यमंत्री पवारांनी दिली माहिती !
बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ | मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयोजित कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरात १६ सप्टेंबरला रोजी येणार होते. मात्र अमित शाहांचा हा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शाह यांचे वेळेचं नियोजन होत नसल्यामुळे, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अमित शाहांच्या दौऱ्यासाठी भाजपकडून आणि प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या दौऱ्यात मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे राज्यातील दौरा वाढले आहेत. अशातच गृहमंत्री अमित शाह यांचा उद्या (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरात दौरा ठरलेला होता. या दौऱ्याची संपुर्ण तयारी करण्यात आली होती.
या दौऱ्यावेळी गृहमंत्री अमित शाह मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. त्याचबरोबर अमित शाह यांच्या सभेची देखील भाजपकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुक्तिसंग्राम दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार होते. एमआयडीसी चिकलठाणा भागात अमित शाह यांची भव्य सभा होणार होती. त्यांचा दौरा देखील गृह मंत्रालयाने जाहीर केला होता. 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बिहारमधील दरभंगा विमानतळावरून विशेष विमानाने संध्याकाळी अमित शाह औरंगाबाद विमानतळावर उतरणार होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम