खरेदीदारांची लागली लॉटरी ; सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ सप्टेंबर २०२३ |देशात गेल्या वर्षभरापासून सोन्यासह चांदीच्या दरात चढ उतार होत असतांना सातत्याने दिसून येत आहे. या पंधरवड्यात सोने-चांदीला मोजून तीन-चार वेळाच दमखम दाखवता आला. उर्वरीत काळात घसरणीचे सत्र सुरु आहे. आता अर्धा सप्टेंबर महिना संपला तरी सोने-चांदी आहे तोच भाव गाठायला संघर्ष करत आहे. पण बाजाराचा रोख पाहता दोन्ही धातू पुन्हा कमबॅक करु शकतात. सध्या या दोन्ही धातू स्वस्त झाले आहेत. खरेदीदारांची लॉटरी लागली आहे.

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिना सुद्धा ग्राहकांना पावला. ऑगस्टच्या शेवटच्या सत्रात सोन्याने चांगलीच मुसंडी मारली होती. भावात 800 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. या महिन्यातील या 15 दिवसांत सोन्यात घसरणच जास्त दिसून येत आहे. काल भावात मोठी वाढ दिसली नाही. 13 सप्टेंबर रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यापूर्वी किंमती जवळपास 400 रुपयांनी उतरल्या होत्या 22 कॅरेट सोने 54650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

या महिन्यात चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली. चांदीने या आठवड्यात 500 रुपयांच्या दरवाढीची सलामी दिली होती. पण गेल्या पंधरा दिवसांत चांदीमुळे ग्राहकांची चांदी झाली. त्यांना स्वस्तात चांदी खरेदी करता आली. 13 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयाची घसरण झाली. 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 7 आणि 6 सप्टेंबर रोजी अनुक्रमे 700 आणि 500 रुपयांची घसरण झाली. 5 सप्टेंबरला 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांनी स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 58,697 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,462 रुपये, 22 कॅरेट सोने 53767 रुपये, 18 कॅरेट 44,023 रुपये, 14 कॅरेट सोने 34,338 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,306 रुपयांपर्यंत घसरला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम