उर्फीला पूर्ण कपड्यात पाहून बसणार धक्का !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ फेब्रुवारी २०२३ । आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असलेली आणि गेल्या काही दिवसापासून वादामुळे उर्फी जावेद चर्चेत राहते. उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. उर्फीला नेगमीच तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

उर्फी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच उर्फीनं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरुवातीला उर्फीचा लूक आणि शेवटी कॅमेऱ्यात जे दिसले ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला उर्फीनं पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाचं स्कर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तर जेव्हा कॅमेरा हा आरशाकडे वळतो तेव्हा त्यात उर्फीची एक नवीन स्टाईल पाहायला मिळते. उर्फीनं तिच्या या नव्या आऊटफिटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीनं बोल्ड मेकअप केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. उर्फीनं हा व्हिडीओ शेअर करत ‘It’s Over’ असे कॅप्शन दिले आहे. उर्फीच्या या नव्या लूकच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम