व्हॅलेंटाईन डे स्पेशल : दिलीप कुमार व मधुबालाची प्रेम कहाणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ फेब्रुवारी २०२३ । व्हॅलेन्टाईन डे हा दिवस अख्या जगभर प्रेमदिवस म्हणून साजरा केला जात आहे. जगातातील प्रतिभावान कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार आणि मधुबाला हे भारतीय चित्रपटात होते. त्यांच्याहि प्रेमाचे अनेक किस्से आहेत. त्यातील हा एका किस्सा. आपल्या दमदार अभिनयाने आणि गाजलेल्या चित्रपटांनी या कलाकारांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाचे चाहते आजही पाहायला मिळतात. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या अफेअरची एकेकाळी इंडस्ट्रीत जोरदार चर्चा होती.

दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे हे अफेअर जवळपास नऊ वर्षे चालले पण लग्नाआधीच त्यांचे मार्ग वेगळे झाले. वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराशी झुंज देत मधुबालानेही या जगाचा कायमचा निरोप घेतला. दिलीप कुमारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मधुबालाने गायक आणि अभिनेता किशोर कुमारसोबत लग्न केले होते.मात्र, मधुबालाची बहीण मधुर भूषण यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतरही तिचे पहिले प्रेम म्हणजेच दिलीप कुमार यांना कधीही विसरू शकली नाही. मधुबालाला सुरुवातीला मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्यांचा आजार लक्षात आला. दिलीप कुमार त्यांना भेटण्यासाठी येथे आले होते. मधुबालाचे लग्न झाले नव्हते तेव्हा ही गोष्ट घडली होती.

दिलीप कुमार यांनी मधुबालाला सांगितले की, आम्ही पुन्हा एकत्र काम करू. मात्र, त्यानंतर मधुबालाने किशोर कुमारसोबत लग्न केले, त्यानंतर दिलीप साहब आणि मधुबाला यांची कधीच भेट झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मधुबालाचा शेवटचा काळ अत्यंत एकाकीपणात गेला होता. मधुबालाच्या मृत्यूनंतर दिलीप कुमारही स्मशानात पोहोचले होते, पण अभिनेत्रीला पाहण्यापूर्वीच त्यांना दफन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम