VI चा जबरदस्त प्लान : अनलिमिटेड कॉलिंग, डेटा मिळणार मोफत !
बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३
देशभरात अनेक टेलिकॉम कंपन्या असून विविध प्लानमुळे नेहमीच जिओ कंपनी चर्चेत येत असते पण सध्या VI ने आपल्या ग्राहकांसाठी नुकतेच दोन नवीन रिचार्ज प्लान आणले आहेत. कंपनी ग्राहकांसाठी प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज प्लान लॉन्च करत असते.
अशातच VI ने अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस प्लान लॉन्च केला आहे. VI चा हा रिचार्ज हजार रुपयांच्या आत प्रीपेड प्लान म्हणून कंपनीने आणला आहे. तसेच हा प्लान १८० दिवसांसाठी असणार आहे. त्यासोबत १२ जीबी डेटा फ्री मिळणार आहे.
VI हा ९४९ रुपयांचा हा प्लान १८० दिवसांसाठी मिळणार आहे. या प्लानमध्ये तुम्हाला १२ जीबी डेटा मिळेल. याचा अर्थ सहा महिन्यांसाठी तुम्हाला १२ जीबी मिळेल. यासाठी तुम्हाला टॉपअप रिचार्ज करु शकता. VI च्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिगसह दिवसाला १०० फ्री एसएमएस मिळतील.
ज्या ग्राहकांचे ड्युल सिम असून ज्यांना ते अॅक्टिव्ह ठेवायचे आहे. त्यांच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जास्तीचा डेटा मिळेल.
VI चा हा प्लान देखील १८० दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळतो. अतिरिक्त डेटासाठी तुम्हाला दैनिक मर्यादेनंतर डेटा हवा असल्यास तुम्ही टॉप अप रिचार्ज करु शकता. यामध्ये तुम्हाला लोकल आणि एसटीडी कॉलसाठी २.५ पैसे प्रति सेकंदाला आकारला जाईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम