हिंगोणे बु.येथे विविध विकास कामांचे थाटात भूमिपूजन

बातमी शेअर करा...

24 लक्षच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश,आ.अनिल पाटील व जि प सदस्या जयश्री पाटीलांची उपस्थिती,

अमळनेर(प्रतिनिधी)-राज्यात कोणतीही उलथापालथ होवो आपल्या मतदारसंघात विकासाचा रथ थांबणार नसून जनतेच्या ज्या अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या पूर्णत्वास नेण्यासाठी मी सक्षम आहे अशी भावना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु. येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी आमदार पाटील यांच्यासह विकास कामांचे भूमिपूजन जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यात प्रामुख्याने जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी 24 लक्षच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थांनी आमदार व जि प सदस्यांचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, सरपंच केदारसिंग जाधव, आमोदे सरपंच राजु मिस्तरी, मुडी-दरेगाव माजी सरपंच राजाराम पाटील, तासखेडा माजी सरपंच तापीराम पाटील, अर्चना पाटील, रोहिदास पाटील, बाबुराव भिल, बाळकृष्ण पाटील, भरतसिंग पाटील, संजय पाटील, अमोल शिंदे, कुमारसिंग जाधव रमेशसिंग पाटील, रणजित पाटील, चेतन पाटील, नारायण पाटील, धुडकू पाटील, धरम पाटील, यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन,,

रुपये 3 लक्ष निधीतून जि.प. स्तर द.व.सु.योजनेंतर्गत शौचालय बांधकाम करणे.,3 लक्ष निधीतून जि.प.स्तर द.व.सु.योजनेंतर्गत रस्ता कॉक्रिटिकरण करणे,जि.प.स्तर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी रुपये 50 लक्ष निधीतून ट्युबवेल मंजुर झाल्याने त्याचा कार्यारंभ करणे, केला.,जि.प. स्तर 1 लक्ष निधीतून अंगणवाडी दुरुस्त करणे,डी.पी.सी. अंतर्गत 13.70 लक्ष निधीतून मराठी शाळेला वॉलकंपाऊंड करणे.आणि डी.पी.सी.अंतर्गत 24.71 लक्ष निधीतून जलजीवन मिशन ची पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करणे आदी कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
उल्लेखनीय विकासकामे मिळाल्याने ग्रामस्थांनी दोघांचेही आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम