आजचे राशीभविष्य, रविवार ७ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०७ ऑगस्ट २०२२ । मेष – तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अतिघाई चांगली नाही.

वृषभ – मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन – आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.

कर्क – बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

सिंह – मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

कन्या – व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.

तूळ – अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.

वृश्चिक – वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.

धनू – कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.

मकर – भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता.

कुंभ – जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.

मीन – घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम