खरंतर पोलीस अधिक्षकांचा दोष काय? नाना पटोले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३  | राज्यातील जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमार घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटताना असतांना या घटनेच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण देखील मोठ तापलं आहे. यादरम्यान लाठीमार प्रकरणात जालन्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.तसेत काँग्रेसकडून आजपासून जनसंवाद यात्रा काढली जाणार असल्याबद्दल देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.

नाना पटोले म्हणाले की, लोकशाही वाचली पाहिजे, सगळ्या जातीधर्माचे लोक सुखाने राहिले पाहिजे यासाठी व्यवस्था निर्माण करणं काँग्रेसचं काम आहे. यासाठी आजपासून आम्ही यात्रेला निघालो आहोत. लोकसभेला खूप वेळ आहे त्यामुळे आठ-नऊ महिने आधी लोकसभेची तयारी करतोय असे म्हणाता येणार नाही असेही पटोले यांनी स्पष्ट केलं. देशात हुकुमशाही प्रवृत्ती तयारी झाली आहे, या हुकुमशाहीच्या भयापासून जनतेला मुक्त करण्यासाठी, त्यांना हिंमत देणं हा या यात्रेचा उद्देश आहे, असेही पटोले यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत, लोकांचं जगणं मुश्किल झालं आहे. तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि भाजपने जगण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला आहे, तुम्हा आत्महत्या करू नका तुम्हाला आम्ही न्याय देऊ हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे असे नाना पटोले म्हणाले. यात्रा आष्टी पासून सुरू होईल आणि ही यात्रा आज २२ किलोमीटर चालेल. दररोज सकाळी सात वाजता ही यात्रा सुरू होईल असेही नाना पटोले यांनी सांगितलं.

जालन्यात पोलीस अधिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे, यावर बोलताना पटोले म्हणाले की, खरंतर पोलीस अधिक्षकांचा दोष काय? सरकारने सौम्य लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला, तर सरकारच दोषी आहे. सरकारच्या आदेशाचं पोलिसांनी पालन केलं. त्यामुळे पोलीस विभाग दोषी नाही, सरकार दोषी आहे. सरकारवरच कारवाई व्हावी, सरकारने पायउतार व्हावं अन्यथा जनता त्यांना खाली ओढेल असेही नाना पटोले म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम