…तर मोफत शिक्षण देणार ; राहुल गांधींचे आश्वासन !
बातमीदार | २९ ऑक्टोबर २०२३
देशभरातील अनेक राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याअसून सर्वच पक्षांनी आता प्रचाराला जोर दिला आहे तर छत्तीसगडमध्ये परत काँग्रेसची सत्ता आली तर सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिले. सोबत तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांना वर्षाला ४ हजार रुपये देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
काँग्रेसकडून आदिवासी आणि गरीब, इतर मागार्सवर्गांसाठी काम केले जाते, तर भाजप फक्त काही मोजक्या अब्जाधीशांसाठी काम करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. कांकेर जिल्ह्यातील भानुप्रतापपूरमध्ये एका सभेला ते संबोधित करत होते. राज्यात पुन्हा आपल्या पक्षाचे सरकार आले तर सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. केजी ते पीजीपर्यंतच्या शिक्षणासाठी एक दमडीही मोजावी लागणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
यापूर्वी सरकारने जी आश्वासने दिली होती, ती सर्व पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला. गत निवडणुकीत आम्ही दोन ते तीन मोठी आश्वासने दिली होती. यात शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य किंमत, कर्जमाफी आणि वीज बिल अर्धे करणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे मोठे नेते हे आश्वासन पूर्ण केले जाऊ शकत नाही, अशी टीका करत होते; परंतु आम्ही हे काम दोन तासांत करून दाखवल्याचे राहुल म्हणाले. तसेच केंद्रात जर काँग्रेसचे सरकार आले तर जातनिहाय जनगणना करण्याचे आणि छत्तीसगडमध्ये सत्ता कायम राहिल्यास जातनिहाय सर्वेक्षण करण्याचे आश्व आश्वासन त्यांनी यावेळी दिले. केंद्रात काँग्रेस सरकार असताना जातनिवाह आकडेवारी गोळा करण्यात आली होती. मोदी सरकार ही आकडेवारी जाहीर करत नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम