कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल जिल्हापरिषद मराठी मुलींच्या शाळेत शालेय साहित्य वाटप

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 07 ऑगस्ट 2022 | कजगाव ता भडगाव येथील युवकाने कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल जिल्हापरिषद मराठी मुलींच्या शाळेत शालेय साहित्य वाटप करून वृक्षारोपण केले व एक वेगळा संदेश दिला आहे.

कजगाव येथील सुतार समाजाचे अध्यक्ष विनोद हिरे यांना कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल त्यांनी आपल्या लेकीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करून एक वेगळा संदेश दिला मुलगी ही आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे तिचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे त्यामुळे मुलगी शिकलीतर समाज शिकेल आणि समाज शिकला तर देश पुढें जाईल.

आज पाहिलेतर मुलगी ही कुठेही कमी नाही त्यामुळे त्यांनी हा संदेश देण्यासाठी हा कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे जिल्हा परिषद शाळेत त्यांनी बालकांना दप्तर वही पेन कंपास आदी शालेय उपोयोगी साहित्य वाटप केले व शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले यावेळी जि प शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन, ग्रामविकास अधिकारी श्री महाजन, सरपंच पती दिनेश पाटील, धर्मराज हिरे, पत्रकार नितीन सोनार, विनोद हिरे, शिक्षिका सुरेखा माळी, धर्मराज पाटील, प्रवीण महाजन, राजेंद्र पाटील, दादाभाऊ पाटील, विनायक राजपूत, रवींद्र पाटील, मांगीलाल मोरे, स्वप्नील पाटील, तेजस येवले, आदी उपस्थित होते तसेच दिनांक १३ रोजी कन्या जन्माबद्दल सावता महाराज मंदिरात स्त्री जीवनावर आधारित बेटीबाचाव विशेष कार्यक्रम हभप मच्छिंद्र महाराज वाडीभोकर सादर करणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम