
डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रनिष्ठा, दृढ इच्छाशक्ती आणि संघटनकौशल्याचा गौरव केला. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता दृढ करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका आणि त्यांच्या कार्यातून देशाप्रती समर्पण, एकता आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी देशाच्या विकासातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या स्थानाला बळकटी देण्यातील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. बँकाचे राष्ट्रीयीकरण, प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्वगुण आणि देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती दिली. या दोन्ही महान व्यक्तींचे जीवन आणि कार्य विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी असून त्यांच्याकडून राष्ट्रप्रेम, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यपालनाची मूल्ये आत्मसात करावीत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थिनी खुशी पाटील हिनेही सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याविषयी आपले विचार व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम