दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम ; सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य !
दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ । राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभूकंप झाल्यानंतर आज राष्ट्रवादी कुणाची यासाठी दोन्ही गटांनी बैठकीचे आयोजन केले असतांना अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे ४२ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे ११ आमदार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार पुढे येतंय.
प्रत्यक्षात कुणाकडे किती संख्याबळ हे १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, शरद पवार गटाची बैठक ज्या वाय.बी. सेंटरमध्ये होत आहे तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे येताच पत्रकारांनी त्यांना घेरलं. यावेळी सुप्रिला सुळे यांनी पत्रकारांना बाजूला जावून थांबण्याची हात जोडून विनंती केली. वाय. बी. सेंटरमध्ये दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम असल्याने बाकीच्या भाडेकरुंना त्रास होऊ नये, यासाठी बाजूला थांबा, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, वाय.बी. सेंटरमध्ये आमदार दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाची एक बैठक देवगिरी निवासस्थानी सुरुय. त्या बैठकीनंतर एमईटी कॉलेज येथे त्यांच्या गटाची बैठक होत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम