अंघोळ करतानाचा एमएमएस व्हायरल; विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । पंजाब येथे ६० विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा एमएमएस व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे वसतिगृहातील आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड विद्यापीठात ही धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री अडीच वाजता काही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गेटजवळ पोहोचल्या आणि घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीने तिच्या सहकारी विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ६० व्हिडीओ चित्रीत केले व एका मुलाला पाठवले आणि त्या मुलाने व्हिडीओज इंटरनेटवर अपलोड करून व्हायरल केले.

या प्रकरणामुळे आठ विद्यार्थिनींनी त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे लक्षात येताच आत्महत्येचा प्रयत्न केला. या आठ विद्यार्थिनींपैकी एकीची प्रकृती गंभीर असून, इतर सात विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विद्यापीठ प्रशासनाने याबाबत सखोल चौकशी केली असता, त्यांनी आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटवली व तिला याबाबत जाब विचारल्यावर तिने आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचे मान्य केले आहे. याचबरोबर हे व्हिडिओ ती ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असल्याचेही सांगितले असून, अद्याप पोलिसांकडून कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा अटकेच्या कारवाईबाबत माहिती समोर आलेली नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम