हायकोर्टाचा मोठा निर्णय :न्यायालयाने फेटाळली याचिका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | देशातील सर्वात मोठा निकाल मानला जाणारा म्हणजे वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरासंदर्भात अलहाबाद हायकोर्टाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला असून हायकोर्टाने परिसरात ASI चा सर्वे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. मुस्लिम पक्षाने या सर्वे विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

आता न्यायालयाच्या निर्णयानंतर ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ सर्वे सुरु होईल. आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. हिन्दू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायालयाने सर्वेला मंजुरी दिली आहे. ASI ने आपलं प्रतिज्ञापत्र दिलय. न्यायालयाचा आदेश आलाय. त्यामुळे आता काही प्रश्न नाहीय” वकिलाने सांगितलं की, ‘न्यायालयाने मुस्लिम पक्षकारांची बाजू फेटाळून लावली” हायकोर्टाच्या निर्णयावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

‘राम मंदिरासारखा याबाबतही निर्णय होईल’
सर्वेमधून सत्य बाहेर येईल. राम मंदिरासारखा याबाबतही निर्णय होईल. आता सर्व शिवभक्तांची मनोकामना पूर्ण होईल असं यूपीचे उपमुख्यमंत्री केवश प्रसाद मौर्य म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम