क्रिकेटच्या मैदानात टाटा कंपनीचे मोठे नुकसान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मे २०२३ ।  देशात आयपीएलचा मोठा कहर सुरु आहे. या मैदानात अनेक टीम खेळत असतात. अशात अनेक बक्षीस सुद्धा ठेवण्यात येत असते. असेच काहीसे बक्षीस म्हणून टाटा आयपीएल 2023 चे अधिकृत प्रायोजक आहेत. यामुळे मैदानात टाटा टियागो ईवी कार मैदानात ठेवली जाते. फलंदाजाने फटका मारला आणि तो थेट मैदानात असलेल्या या कारला लागल्यास 5 लाख रुपये दिले जातात.

डावखुऱ्या नेहल वढेराने उत्तुंग फटका मारला आणि मैदानाबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर जाऊन आदळला. गाडीच्या दरवाजावर जाऊन बरोबर हँडलच्या वर लागला. यामुळे गाडीला डेंट आला. असं या स्पर्धेत दुसऱ्यांदा झालं आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाडने गाडीचं नुकसान केलं होतं. टाटा समूहाकडून 5 लाख रुपयांची रक्कम कर्नाटकमधील कॉफी प्लाँट्सला मागच्या वेळेस देण्यात आली होती.

 

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून पराभूत केलं. मोठ्या विजयामुळे मुंबईला जबरदस्त फायदा झाला आहे. मुंबईने गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम