डब्बा टीव्ही होईल स्मार्ट; घरी आणा ‘हा’ डिव्हाईस

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । बऱ्याचदा आपला साधा टीव्ही पाहून प्रत्येकाला वाटते की, आपणही स्मार्ट टीव्ही घ्यावा. पण हा खर्च प्रत्येकाला परवडेलच असे नसते. कारण नवा टीव्ही विकत जरी घेतला जुन्या टीव्हीचे करायचे काय? असाही प्रश्न पडतो, म्हणून आम्ही आपल्याला अशा स्मार्ट डिव्हाईस ची माहिती देणार आहोत, जो अत्यंत स्वस्त आहे.

या लहानशा स्मार्ट डिव्हाईसचे नाव आहे एमआय 4के स्ट्रीमिंग बॉक्स. आकाराने लहान असलेला हा स्मार्ट टीव्ही बॉक्स अँड्रॉइड 9 पाय व्हर्जनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात २गीगाहर्टझचा क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. एमआय 4के स्ट्रीमिंग बॉक्समध्ये २जीबी रॅम व ८जीबी स्टोरेज असून, यात एक यूएसबी पोर्ट आहे, ज्याला आपण एक्सटर्नल स्टोरेज अथवा पेनड्राइव्ह जोडू शकतो. तसेच यात गुगल प्ले स्टोरच्या मदतीने विविध एप्स डाउनलोड करून सेव्ह करता येतात. याला फक्त एचडीएमआय केबलच्या साहाय्याने टीव्हीला जोडा व स्मार्ट फीचर्स अनुभवा.

कनेक्टिव्हिटीसाठी यात क्रोमकास्ट, ब्लुटूथ, वायफाय इत्यादी फीचर्स आहेत, हा स्मार्ट टीव्ही बॉक्स आपल्याला ₹२,९९९ रुपयांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम