भिलालीत 96 लक्षच्या विकासकामांचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

बातमी शेअर करा...

अमळनेर-(प्रतिनिधी)तालुक्यातील भिलाली येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 96 लक्षच्या विकासकामांचे आमदार पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन करण्यात आले.
आमदारांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले,तसेच सत्कारही करण्यात आले,आमदारांनी आपल्या मनोगतात मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा मांडून बहुतांश विकासकामे पूर्णत्वास आली असल्याचे सांगितले तर बहुतांश विकासकामे प्रगतीपथावर असून गेल्या महिनाभरापासून कोट्यावधीच्या विकासकामांचे भूमीपूजन होऊन काम प्रत्यक्षात सुरूही झाले आहे,कोणत्याही गावावर अन्याय न करता समान न्यायाचे आपले धोरण असल्याची माहिती आमदारांनी दिली.यावेळी बाबूलाल पाटील, अविनाश लोटन पाटील (सरपंच), पि.के.पाटील, बाबुराव प्रतापसिंह गिरासे, हारसिंग गजमल गिरासे, रमेश राजाराम कोळी, उमेश रविदास माळी, भिकन अभिमान माळी, लखेसिंग रामसिंग गिरासे, सुनील भास्कर पाटील व सर्व भिलाली ग्रामस्थ उपस्थित होते.

या विकासकामांचे झाले भूमीपूजन

आमदार निधीतुन सभामंडप बांधणे रक्कम 15 लक्ष,
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत गावात काँक्रिटीकरण करणे रक्कम 10 लक्ष डी.पी.सी. अंतर्गत मराठी शाळेचा वॉलकंपाऊंड बांधणे,रक्कम 20 लक्ष ,जलसिंचन मिशन अंतर्गत- गावात पाणीपुरवठा करणे हे काम टेंडर प्रोसेसला असून रक्कम रु 51.19 लक्ष असे एकूण रक्कम रुपये 96.19 लक्षच्या कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम