महाज्योतीकडून चोपडा तालुक्यात ४ विद्यार्थ्यांना टॅब !

लासूर येथील जितेंद्र महाजन यांनी केले होते मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ फेब्रुवारी २०२३ । चोपडा तालुक्यातील लासूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना करण्यात आलेली आहे.

महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET, MPSC, UPSC आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.

त्याच प्रकारे सन 2022 – 23 या वर्षी 11 वी सायन्स या वर्गात प्रवेशित असलेले विद्यार्थी तसेच ज्या विद्यार्थ्यांना 10 वीत 65% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योति च्या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे बाबत आवाहन करण्यात आलेले होते. त्या बाबत चोपडा येथील भगिनी मंडळ कॉलेज ऑफ सोशल वर्क अल्युमनी असोसिएशनचे अध्यक्ष व श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी लासुर येथील चार ही विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे पासून तर त्यांचे ऑनलाईन लेक्चर साठी येणाऱ्या अडचणी बाबत मार्गदर्शन केले. यासाठी गौरव विकास ठाकरे, पूर्वेश गुणवंत महाजन, साक्षी राजेंद्र महाजन, दर्शना कैलास माळी या विद्यार्थ्यांना सॅमसंग कंपनीचा टॅब मिळाला असून दररोज 6GB नेट डाटा महाज्योति कडून कुठलाही मोबदला न देता मिळणार आहे तसेच सदर लासुर गावातून 4 विद्यार्थीचे 40 विद्यार्थी कसे होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन जितेंद्र महाजन यांनी केले.

सदर टॅब मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार नानासाहेब ए के गंभीर सर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के गंभीर सर, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष हिम्मतराव महाजन, माळी समाजाचे माजी उपाध्यक्ष डॉ राजेंद्र महाजन, सचिव सुरेश पवार, सह सचिव अरुण माळी, संचालक मास्टर टेलर्स, किसान विद्या प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष अजय पालिवाल, मुरलीधर सोनवणे, वि का सह सोसायटी चेअरमन सुरेश माळी, पीक संरक्षण चेअरमन गोकुळ माळी, माजी व्हा. चेअरमन किशोर माळी सर,वि का सो सा संचालक प्रकाश माळी, माजी चेअरमन एन टी महाजन, संचालक नोमिल पटेलिया, सामाजिक कार्यकर्ते वना पवार,आबा कोळी, देविदास मगरे,तापीराम महाजन, देवाजी माळी, प्रल्हाद महाजन, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश माळी, शाहरुख खाटीक, नाना पाटील, शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष योगेश्वर माळी, सरस्वती क्लासेसचे संचालक विनोद महाजन, A वन क्लासेसचे संचालक राहुल पाटील, सह संचालक यश महाजन, निखिल महाजन, विद्यार्थ्यांचे पालक राजेंद्र महाजन, विकास ठाकरे, गुणवंत महाजन, अरुण महाजन आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जितेंद्र महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम