आजचे राशीभविष्य, मंगळवार ६ सप्टेंबर २०२२
दै. बातमीदार । ०६ सप्टेंबर २०२२ । मेष – आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.
वृषभ – भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.
मिथुन – मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.
कर्क – कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.
सिंह – काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.
कन्या – धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.
तूळ – एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.
वृश्चिक – आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
धनू – मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.
मकर – घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.
कुंभ – आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.
मीन – कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम