मुंदडा ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी “योगास्पर्धेत” गाठले विभागीय स्तर

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख)
अमळनेर जिल्हा क्रिडाअधिकारी कार्यालय जळगांव यांनी आयोजीत केलेल्या शालेय क्रिडा स्पर्धेत मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुलच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा घवघवीत यशाचा धमाका, जळगांव येथे घेण्यात आलेल्या योगा स्पर्धेत जळगाव जिल्हयातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात ग्लोबल स्कुलच्या १४ व १७ वर्षाखालील मुले व मुलींनी यशाचे शिखर गाठत जिल्हास्तरावरून विभागीय स्तरावर मजल मारली. यात मुलींच्या गटात इयत्ता ६ वी च्या विद्यार्थीनी रूचिका पाटील, हर्षिता साळुंखे व दिक्षा संदानशिव तसेच मुलांच्या गटात इयत्ता १० वी चा विद्यार्थी सुयश जैन हे विद्यार्थी जिल्हास्तरावर विजयी होवुन सदर विद्यार्थ्यांनी विभागीय स्तर गाठले. सदर स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सौ. पायल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ.छायाभाभी मुंदडा, सहसचिव श्री योगश मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, अॅडमिनीस्ट्रेटर सौ. दिपीका अमेय मुंदडा, श्री. नरेंद्र मुंदडा, श्री. राकेश मुंदडा, श्री. पंकज मुंदडा, सर्व पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, प्रायमरी प्राचार्या सौ. विद्या मॅडम, प्रि-प्रायमरी को-ऑडीनेटर सौ. योजना ठक्कर, सर्व शिक्षिक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर विद्यार्थी व शिक्षिका यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम