हडपसरमध्ये रिक्षाचालकाची पोलीस शिपायाला मारहाण; काय आहे प्रकरण?
पुण्यातील हडपसर भागात नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्यामुळे रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केली.
सचिन अंबादास शेलार (वय २८, रा. मुंढवा) असे या प्रकरणातील आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. शेलार याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक प्रमोद ढाकणे (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी शेलारने रिक्षा रस्त्यात आडवी लावली होती. पोलीस नाईक ढाकणे यांनी त्याला रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले असता, शेलारने ढाकणे यांना धक्काबुक्की केली आणि दगड फेकून मारला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम