अभिनेत्री प्रार्थनाने केला तो व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत शेवटची पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने नेहाची भूमिका साकारली होती. पण ती नेहमीच सोशल मिडीयावर वेगवेगळे फोटो व्हायरल करून आपल्या चाहत्यांना चांगलेच घायाळ करीत असते.

या मालिकेतून तिला खूप प्रेम मिळाले. या मालिकेत प्रेक्षकांना तिचा सोज्वळपणा, साधेपणा खूप भावला. आजही प्रेक्षक नेहाला मिस करतात. प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर व्हाइट टॉपमधील फोटोंचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की,बड़ी धीरे जली रैना, धुआं धुआं नैना. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. प्रार्थनाच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. ब्युटीफुल. गॉर्जिअस, खूप छान अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम