आजचे राशीभविष्य, गुरुवार १५ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १५ सप्टेंबर २०२२ | मेष – काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. विद्यार्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा.

वृषभ – मानसिक चंचलतेला आवर घालावी. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे.

मिथुन – सरकारी कामे मार्गी लागतील. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या वस्तु सांभाळाव्यात. कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

कर्क – मुलां प्रतीच्या जबाबदार्‍या पार पाडाल. कामा निमित्त छोटे प्रवास घडतील. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका.

सिंह – राजकीय संपर्कातून लाभ होईल. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. धाकट्या भावंडाचे सहकार्य लाभेल.

कन्या – कामाच्या शोधात असणार्‍यांना दिलासादायक दिवस. व्यवसायिकांना संपर्कातून लाभ होईल. उत्तम स्त्री सौख्य लाभेल.

तूळ – हसत खेळत वागणे ठेवाल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक – दिवस माध्यम फलदायी असेल. आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी. बोलण्यात माधुर्य ठेवल्यास कामे सुरळीत पार पडतील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे.

धनू – व्यायामाचा कंटाळा करू नका. विरोधक नरमाईची भूमिका घेतील. नवीन व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील. सासरच्या मंडळींकडून लाभ होतील.

मकर – आहाराची पथ्ये पाळावीत. धार्मिक बाजू भक्कम कराल. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. जुने मित्र भेटल्याने मन प्रसन्न राहील.

कुंभ – मनातील इच्छा पूर्ण होतील. संयमाने कार्यरत राहाल. अचानक प्रवास संभवतो.

मीन – मुलांच्या जबाबदार्‍या पार पडण्यात दिवस निघून जातील. काही कुरबुरी चर्चेतून दूर कराव्यात. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम