जिल्ह्यात दुचाकी व चारचाकीचा अपघात ; एक ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑगस्ट २०२३ | जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर होत असलेल्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असून आज देखील जिल्ह्यात चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी तर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील भवानी घाटात दि.२६ ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्यातील काही तरूण शिरसाळा मारूती दर्शनासाठी जात असतांना बोदवड कडून भरधाव चारचाकी येत असतांना या घाटात दुचाकी व चारचाकीची समोर समोर धडक झाली हा अपघात रामवन मंदिरा समोर झाला. या अपघातात अर्जुन सुकलाल जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. तर अर्जुन जाधव सुरवाडे व तुषार संतोष जामदार रा. पुंगाव हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर चारचाकी वाहन नाल्यात जावून पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर, वंदना माधव दांभोरे, प्राजक्ता विठ्ठल आसुदे रा. छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम