काय सांगता : शिंदे व ठाकरे येणार एकत्र ; राज्यात चर्चा सुरु !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  गेल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. दरम्यान, आता आशिष देशमुख यांनी खळबळजनक असं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि महाविकास आघाडी तुटेल असं वक्तव्य त्यांनी केलंय. आशिष देशमुख म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येऊन महाविकास आघाडी तुटेल. दोन्ही गट एकत्र आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावाही आशिष देशमुख यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे खासदार, आमदार निलंबीत होऊ नयेत म्हणून ठाकरे गट शिंदे गटासोबत जाईल. ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदार, खासदारांना आपलं राजकीय भवितव्य डावावर लावायचं नाही असंही आशिष देशमुख म्हणाले.

काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्या भेटीला काही दिवस होताच आशिष देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी? राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सध्या राज्यात होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हटलं जात होतं. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने राज्यातही उशीर होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णयही शिंदे-फडणवीस आणि मोदी-शाह हेच घेणार असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम