खासदार उन्मेष पाटील करणार शिवसेनेत प्रवेश? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२४ । भाजप खासदार उन्मेष पाटील ( Unmesh Patil) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी आज सकाळी मुंबई येथे दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळेलल्या माहितीनुसार, लवकरच खासदार उन्मेष पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आज दि. २ एप्रिल मंगळवारी रोजी पहाटे उन्मेष पाटील पत्नी संपदा पाटील, पारोळ्याचे करण पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे. सुरुवातीला ते नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते; मात्र राऊत मातोश्रीवर असल्याने त्यांची भेट झाली नाही. जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याशी उन्मेष पाटील यांची चर्चा झाली असून श्री. पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सामोरे आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम