महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्र. १६ मध्ये धडाका; जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर, लक्ष्मीनारायण नगर परिसरात पाहणी

बातमी शेअर करा...

महापौर दीपमाला काळे यांचा वॉर्ड क्र. १६ मध्ये धडाका; जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर, लक्ष्मीनारायण नगर परिसरात पाहणी

जळगाव :‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) वॉर्ड क्रमांक १६ मध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी अस्वच्छता, रस्त्यांवर टाकलेले बांधकाम साहित्य, नाल्यांमधील कचरा आणि ओपन स्पेसवरील अतिक्रमणे पाहून त्यांनी संबंधित अधिकारी व दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच तातडीने उपाययोजना करण्याचे सक्त निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, रंजना वानखेडे, वंदना इंगळे, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, नरेंद्र सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे आणि पाणीपुरवठा, बांधकाम व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विठ्ठल मंदिर परिसरात महापौरांनी पाहणी करून पाणीपुरवठा विभागाला नळांच्या तोट्या चेक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपूर्ण असलेली ‘अमृत’ योजना नळ कनेक्शन त्वरित जोडून घेण्यास सांगितले. रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांना ते तात्काळ उचलण्याचे आदेश देण्यात आले.कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या नाल्यात थर्माकोलचे बॉक्स मोठ्या प्रमाणावर साचलेले पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. एमआयडीसी भागातून हा कचरा येत असल्याची माहिती मिळताच, पोकलँड वाहन बोलावून नाला व आतील शेवाळ तातडीने साफ करण्याचे निर्देश दिले. तसेच नाल्याशेजारील उपयोगात नसलेले शौचालयाची तपासणी करून तोडून टाकण्यास सांगितले.ट्रान्सपोर्ट नगरमध्ये महामार्गालगत कुशनचा मोठा कचरा दिसून आला. ट्रान्सपोर्ट नगरातील दुकानांच्या रस्त्यांवर वाहनांच्या तुटलेल्या काचा, भंगार पडल्याचे निदर्शनास आल्यावर महापौरांनी संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. येथील रस्ता पूर्णपणे बंद असून जमिनीचा रंग काळा पडल्याने तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्यास सांगितले.ट्रान्सपोर्ट नगर मधील मार्केटमध्ये ओपन स्पेसमध्ये डंपर व जुनी वाहने उभी करून अतिक्रमण केल्याचे आढळल्याने महापौरांनी दुकानदारांना दरडावले. “ही वाहने आजच काढून घ्या, अन्यथा महापालिकेची वाहने बोलावून लवकर जागा मोकळी केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. महानगरपालिकेच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या भागात रस्ता नसल्याने नागरिकांना व महिलांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली.

साई पार्कजवळील नाल्यावरील घराभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. ट्रान्सपोर्ट नगरजवळील ‘रेड स्वस्तिक’च्या रिकाम्या जागेत महापालिकेच्या विविध विभागांचे कार्यालय उभारता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेश दिले. तसेच लक्ष्मीनारायण नगरमध्ये नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करा, नाला सफाई आणि पथदिव्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यास सांगितले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम