भारत जोडो यात्रेत १० हजार फेटेधारी सहभागी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ नोव्हेबर २०२२ कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला राज्यात दररोज प्रतिसाद वाढत आहे. आज भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते आणि माजीमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या दहा हजारांवर कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदवला. विषेश म्हणजे कोल्हापूरकर यावेळी फेटे बांधून भारत जोडो यात्रेत दिसून आले.

भारत जोडो यात्रा आज बाळापूर होते. यावेळी कोल्हापूरकरांनी फेटे बांधून यात्रेस सामील होऊन उपस्थितांचा उत्साह वाढला. यावेळी राहुल गांधी यांना फेटा बांधण्यात आला. तसेच नफरत छोडो भारत जोडो, अशा घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूरकरांनी सकाळच्या गुलाबी थंडीत राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण यात्रेच स्वागत केलं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या हाता आमचं ठरलं असे बॅनर पाहायला मिळाले. १० हजार फेटे बांधून कोल्हापूरकर यात्रेत सामील झाल्याने यात्रेत जणू लाल रंगाची उधळण झालेली पाहायला मिळाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम