२६/११ चा बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला ; फडणवीसांची टीका !
दै. बातमीदार । १९ मे २०२३ । राज्यातील ठाकरे व फडणवीस यांच्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्या पुस्तकाचा आधार घेत उद्धव ठाकरे व कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, “आपण अडीच वर्ष एक सरकार बघितलं. त्या सरकारमध्ये नेमकं काय होतं? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. त्या सरकारचा विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. आपण खंडणीखोरांपासून दाऊदपर्यंतचा संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळातला समावेश पाहिला. मंत्रिमंडळातला समावेश तर ठीकच आहे, पण मुख्यमंत्र्यांना एकूण अडीच वर्षामध्ये केवळ काही तास मंत्रालयामध्ये बघितलं. आपण मोठ्या लोकांची गळचेपी होताना बघितलं. पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं कांडदेखील बघितलं”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“नरेटिव्ह कसं, संजय राऊतांना बेल मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना बेल मिळाली नाही तर लोकशाहीची हत्या, अशाप्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न बघितल. पण आपण आता अशा कोणत्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाहीय”, असं आवाहन फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. “मला तर फार मजा आली, आमचे नाना पटोले, काल-परवा, त्यांना तर अवॉर्डच दिला पाहिजे, ते म्हणाले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरचे स्फोटके मीच ठेवले. आता मला इच्छा झाली की, आपणही एक स्टेटमेंट द्यावं, 26/11 चा बॉम्बस्फोट नाना पटोले यांनीच केला”, अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम