बागेश्वर धामच्या समर्थनार्थ ५० हजार साधू मैदानात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । सध्या देशात सोशल मिडीयावर चर्चेत आलेले मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आता तब्बल ५० हजार साधू-संत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे.

मध्य प्रदेशातल्या साधू-संत आणि पुजाऱ्यांच्या संघटनांनी आज एक ठराव मंजूर केला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात कुणी षड्यंत्र आखलं तर त्याच्याविरोधात साधू-संत रस्त्यावर उतरतील. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० हजार साधू रस्त्यावर आंदोलन करणार आहेत.

आज संघटनेच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. भोपाळच्या गांधी भवन येथे संघनेचा वर्धापन दिन आयोजि करण्यात आलेला होता. ठरावामध्ये पुढे म्हटलं आहे की, कुठली संस्था महंत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल तर त्यांच्या विरोधात ५० हजार संत रस्त्यावर उतरतील. संत-पुजारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र दीक्षित यांनी बागेश्वर पीठाचं समर्थन करत धीमेंद्र शास्त्रींवर होत असलेल्या आरोपांचा निषेध केला. ते म्हणाले की, जर कोणी वैदिक धर्माचारण करणारा, कथाकार यांचा अपमान करत असेल तर आम्ही सहन करणार नाही.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशासाठी काही केलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. ‘आज तक’ने त्यांची मुलाखत घेतली आहे. तुम्ही कोरोना महामारी येणार किंवा दहशतवादी हल्ल्याविषयी माहिती देऊन देशाची मदत केली का? असे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर बाबा म्हणाले की, मी कोणी भविष्यकार नाही की ज्योतिषाचार्य नाही. परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूतींवरुन समस्यांचं समाधान करतो. जेव्हा एखादा राजकीय नेता माझ्याकडे येतो आणि राज्याविषयी प्रश्न विचारतो तेव्हा मी योगायोग आणि संभाव्यता सांगतो. परंतु कुणी काही मागणं मांडणार नसेल तर प्रश्न सुटतील तरी कसे?, असं ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम