रिक्षा-दुचाकीचा समोरा-समोर अपघात; दोघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ एप्रिल २०२४ । यावल-चोपडा मार्गावरील वढोदे नजीकच्या रस्त्यावर रिक्षा आणि दुचाकीचा जोरदार मोठा अपघातझाला. रिक्षातील दाम्पत्य आणि दुचाकीवरी दाम्पत्य हे गंभीर जखमी झाल्याची घटना सामोरे आली आहे.

कैलास विक्रम पाटील (वय ५२) व त्यांच्या पत्नी आशा वर्कर वंदना कैलास पाटील (वय ४८, रा. गिरडगाव ता. यावल) हे यावल येथून आपले शासकीय कामकाज आटोपुन आपल्या घरी येणासाठी दुचाकी (एमएच १९ बीसी २१००) या दुचाकी वाहनाने यावलहुन गिरडगावला येण्यासाठी निघाले. त्यावेळी वढोदे गावाजवळ समोरून येणारी रिक्षा (एमएच १९ सि डब्ल्यु५१२१)ने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात कैलास पाटील व त्यांच्या पत्नी वंदना पाटील यांना गंभीर दुखापत झाली. तर रिक्षातील दाम्पत्य देखील जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरेंद्र बागुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत तात्काळ जखमींना यावलच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. यावल पोलीसांनी अपघातातील दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम