
भडगाव महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळू वाहतूक डंपर वर कार्यवाई
भडगाव/प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील शहरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा करण्यावर महसूल पथकाकळून जोरात कार्यवाई सुरू असून आठवडाभरात दुसरी कार्यवाई करत पथकाने काल मध्यरात्री तालुक्यातील गिरड गिरणा नदी पात्रातून सहा ब्रास अवैध वाळू भरलेला दहा टायरी डंपर पकडुन भडगाव शासकीय विश्राम गृह येथे जमा करण्यात आला असून यावर दंडात्मक कारवाई करून आर. टी. ओ. कडे वर्ग करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली आहे.
भडगाव तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायबतहसिलदार रमेश देवकर, तलाठी राहूल पवार, तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी व्ही.सी.पाटील, तलाठी व्ही पी शिंदे, वाहनचालक लोकेश वाघ, पोलीस कॉन्सटेबल राजेंद्र पाटील, तात्याबा नागरे या पथकाने ही कारवाई केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम