गायिका आशा भोसले यांचा सल्ला ; अमृता गाण्याचा सराव कर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ ।  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांची भेट घेतली. या भेटीविषयी अमृता यांनी सोशल मिडीयावर भावना व्यक्त केल्या.

 

या भेटीविषयी अमृता लिहितात.. श्रीमती आशा भोसले यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले! आशा भोसलेंशी म्युझिक आणि इतर संगीताबद्दल छान संवाद साधला. आशा ताईंनी मला गाण्याची प्रॅक्टिस करायला सांगितलं. याशिवाय व्हॉईस मॉड्युलेशनबाबत खूप मार्गदर्शन केले. आता आमच्या पुढील संगीत भेटीसाठी आम्ही उत्सुक आहोत. आशा भोसले आणि अमृता फडणवीस यांची ही भेट खास ठरली. अमृता यांनी आशा भोसले यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याशिवाय आशा भोसलें सोबत खास फोटो काढला. दोघींनी अनेक विषयांवर खास चर्चा केली. अशीही चर्चा आहे की अमृता फडणवीस आणि आशा भोसले यांचं एकत्रित गाणं येणार अशी चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम