कवि अजय भामरे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख) येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक,कवि तथा पत्रकार अजय भामरे यांना प्रोटान संघटनेतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने ४ डिसेंबर रोजी जळगाव येथील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर उपशिक्षणधिकारी ए.आर.शेख, प्रोटान शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार,अशोक बिऱ्हाडे, रविकिरण बि-हाडे ,भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, कार्याध्यक्ष मुबारक शहा, कोषाध्यक्ष मिलींद निकम, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
शिक्षक, पत्रकार तथा कवी अजय भामरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने शांतीनिकेतन प्राथमिक शाळेतील शिक्षक बंधु-भगिनींनी अभिनंदन केले तसेच अनेक मान्यवरांसह शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून तसेच मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम