अमित शहा ठोकणार ‘त्या’ मतदार संघात तळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑगस्ट २०२३ | देशातील मध्यप्रदेश मधील निवडणुकीच्या तारीख जरी जाहीर नसली तरी सर्वच पक्ष निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली असून राज्यातील सत्तारुढ पक्षाने आतापासूनच आपल्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. पार्टीने सर्वप्रथम हरलेल्या 39 जागांवर उमेदवारांची घोषणा केली.

भाजपाने रविवारी “बृहद प्रदेश कार्यसमिती” बैठक ग्वालियरमध्ये बोलवली आहे. भाजपाने राज्यातील निवडणूक प्रचारावर भर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या बैठकीत निवडणूक रणनिती आणि रोडमॅप तयार करतील. पक्षाच्या 1200 नेत्यांना या बैठकीत सहभागी होण्यासाठी बोलावलं आहे. एकूण 20 श्रेणीतील नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पहिल्यांदा खास पद्धतीची बैठक बोलवण्यात आली आहे. प्रदेशातील सर्व महत्त्वपूर्ण नेत्यांना एकाच मंचावर अमित शाह यांनी बोलावलं आहे. प्रदेश कार्यसमितीचे सर्व सदस्य, राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदार, सर्व आमदार, सर्व महापौर आणि सर्व नगर निगमच्या अध्यक्षांमना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशातील सर्व जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा बैठकीत सहभागी होतील. प्रदेशातील सर्व निगम मंडल आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांना बैठकीसाठी बोलावलं आहे. पार्टीचे सर्व जिल्हा प्रभारी आणि जिल्हा अध्यक्ष या बैठकीला येतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम