राऊतांच्या अडचणीत वाढ ? : बेळगाव कोर्टाने समन्स !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरू इथं एक खळबळजनक वक्तव्य केलं होत. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे राज्यात कर्नाटक आणी महाराष्ट्रवाद पेटला आहे. आणि अशातच राऊतांना समन्स मिळाल्याने चर्चांना उधान आलं आहे.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स पाठवण्यात आलं आहे. ३० मार्च २०१८ मध्ये राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठपण्यात आलं आहे. तर १ डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार संजय राऊत १ डिसेंबरला कोर्टात हजेरी लावणार आहेत.

काय म्हणाले राऊत !
“सीमा भागातील लोकांच्या मागे शिवसेना उभी आहे, सीमा भागातील लोकांवर हल्ले केले, कायद्याची भिती दाखवली, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील मी केलेल्या भाषणात प्रक्षोभक काय आहे हे मला अजून माहित नाही. २०१८ च्या भाषणाची दखल आत्ता घेत मला समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यांच असं मत आहे मी कोर्टात जावं आणि तिथे माझ्यावर हल्ला व्हावा आणि मला अटक करण्यात यावं तुरूंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान माझ्या विरोधात चालू असल्याचं माझ्या कानावर आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम