५१ व्या वर्षी भाजप खा.तिवारी बनले तिसऱ्यांदा बाप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ डिसेंबर २०२२ ।  सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असलेले भाजप खासदार मनोज तिवारी हे तीसऱ्यांदा बाप बनले आहेत. आज त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. मनोज तिवारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यानंतर त्यांनी पत्नी सुरभि यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर मनोज तिवारी यांचे फॅन्स आणि सेलेब्रिटींनी त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.

मनोज तिवारी म्हणाले, “माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे, हे कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे. आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला. तिच्यावर तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असू द्या… ” – सुरभि -मनोज तिवारी.

 

काही दिवसांपूर्वी, 51 वर्षीय राजकारणी मनोज तिवारी यांनी त्यांची पत्नी सुरभी तिवारीच्या ‘बेबी शॉवर’चा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता आणि ते लवकरच दुसऱ्या मुलाचा बाप होणार असल्याची माहिती दिली होती. मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे हे दुसरे अपत्य आहे. मनोज तिवारी यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगीही आहे.
सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी असून त्यांच्या घरी 2020 मध्ये पहिल्या मुलीचा जन्म झाला. यापूर्वी मनोज तिवारी यांनी 1999 मध्ये राणी तिवारीशी लग्न केले होते आणि दोघांना रिती नावाची मुलगी आहे. 2012 मध्ये, मनोज आणि राणी तिवारी यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम