आम्ही ठरवले तर शेवटच्या २४ तासात देखील निर्णय होईल – बावनकुळे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना पत्र काढून उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ.सुधीर तांबे नाशिकमध्ये पोहचले. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरणे टाळले. त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर जो वाद सुरु झाला त्यावर थेट तांबे यांना पक्षाने निलंबित केले. आता तांबे अपक्ष उमेदवार आहे.

नाशिकमध्ये अपक्षांची लढाई आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे आहेत. भाजपने या निवडणुकीत शेवटच्या 24 तासांत एखाद्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला. उमेदवारी जाहीर होऊनही ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरलाच नाही. त्याऐवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. आज निवडणुकीत प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मात्र अजूनही भाजपने तांबे यांना पाठिंबा जाहिर केलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात यात आणखीन रंगत वाढणार असल्याचे दिसून आले. याबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये अपक्षांची लढाई आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडीचाही उमेदवार नाही. त्यांनीही अपक्षाला पाठिंबा दिला आहे. भाजपने या निवडणुकीत शेवटच्या 24 तासांतही निर्णय घेतला की यांना समर्थन द्यायचं आहे तर आमचा पक्ष तयार आहे. मतदारही तयार आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मला याबाबत घोषणा करायची गरज नाही. मी काल भाजपा पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी एकमताने निर्णय करावा आणि मतदान करावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम