१० वी पाससाठी मोठा फायदा : रेल्वेत विविध पदासाठी मागविले अर्ज
दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील १० वी पास युवकासाठी मोठी सुवर्ण संधी निघाली असून या विविध पदासाठी रेल्वे प्रशासनाने अर्ज मागविण्यात आले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC), भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
ग्रुप ‘C’ लेवल-2 (7th CPC) -या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12th Pass with ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
भूतपूर्व ग्रुप ‘D’ लेवल-1 (7th CPC) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 10th Pass with ITI, NCVT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://secr.indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम