अक्षय तृतीयेआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० एप्रिल २०२३ ।  देशातील हिंदूंसाठी एक शुभ आणि पवित्र दिवस म्हणजे अक्षय्य तृतीयेला मानली जाते व येत्या दोन दिवसावर २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. त्या आधी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेला लोक सोनं खरेदी करतात.

अक्षय तृतीयेच्या आधी सोन्याला चांगली मागणी दिसून येत आहे. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणंदेखील शुभ मानलं जातं. मात्र यावेळी सराफा बाजारात विशेष मागणी दिसून येत नाही. परिणामी सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्स एक्सचेंजमध्ये ५ जून २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १.११ टक्क्यांनी किंवा ६७१ रुपयांनी घसरून ५९,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण दिसून आली. बुधवारी संध्याकाळी एमसीएक्सवर चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत मोठी घसरण दिसून आली. ५ मे २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव MCX वर १.४० टक्क्यांनी किंवा १०५२ रुपयांनी कमी होऊन ७४,१९७ रुपये प्रति किलो होता. त्याच वेळी, ५ जुलै २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव १.३३ टक्क्यांनी किंवा १०१५ रुपयांनी कमी होऊन ७५,५२० रुपये प्रति किलो होता.

जागतिक पातळीवर बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग नुसार कॉमेक्सवरील सोन्याचा फायदा दर १.५९ टक्क्यांनी किंवा ३२.२० रुपयांनी घसरून १९८७.५० डॉलर्स प्रति औंसवर ट्रेड करत होती. त्याच वेळी, सोन्याचा जागतिक स्पॉट दर १.५४ टक्क्यांनी घसरून ३०.९६ डॉलर्स प्रति औंस वरून १९७४.४९ वर ट्रेड करत होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम