
सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
दै. बातमीदार । ३ मे २०२३ । गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीचे भाव वधारले होते पण आता पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,220 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 74233 रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव शुक्रवारी संध्याकाळी 60,168 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी 60,220 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदी महाग झाली आहे.
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59979 रुपये झाली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे सोने आज 55162 रुपये झाले आहे. 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 45165 पर्यंत खाली आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धता असलेले सोने महाग होऊन आज 35229 रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 74233 रुपये झाला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम