मोठी बातमी : आ.बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने भादंविचे कलम 353 अन्वये दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांना नाशिक सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले आहे. येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम