बिपाशा बासूने व्हायरल केले मुलीचे फोटो !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ सोशल मिडीयावर गेल्या काही महिन्यापासून बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बरेच दिवसापासून चर्चेत होते. बिपाशा बासूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मूलीच्या जन्मानंतर ही दोघंही खुप आनंदी आहेत. बिपाशा तिच्या मुलीची अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. बिपाशा आणि करणने आपल्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर करत मुलीच्या नावाचीही घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव ‘देवी’ ठेवलं आहे. ‘देवी बासू सिंग ग्रोव्हर’ असं तिचं पुर्ण नाव आहे.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर मंगळवारी त्यांची मुलगी देवीच्या जन्मानंतर रुग्णालयातुन घरी परततांना दिसले. आज सकाळी या जोडप्याला पापाराझींनी त्यांच्या मुंबईतील त्यांच्या घराबाहेर क्लिक केले. बिपाशाने शनिवारी मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला. तेव्हापासून आई आणि मूल दोघंही रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होते.

 

यावेळी पापाराझींना पोज दिली. यावेळी काळ्या आणि पांढर्‍या प्रिटिंगच्या ड्रेसमध्ये दिसली तर तिने देवीला गुलाबी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं होतं. तर देवीचे वडिल म्हणजेच करण शॉर्ट्स आणि टी-शर्टमध्ये दिसला. पापाराझींनी विंनती केल्यावर दोघेही समोर आले. फोटो काढण्यासाठी काहीवेळ पोझ दिली. याआधीही बिपाशाने इन्स्टाग्रामवर मुलीचा फोटो शेअर केला होता. तिने केलेल्या पोस्टमध्ये बिपाशा आणि करणने असे म्हटले आहे की, ‘देवी बासू सिंग ग्रोव्हर- आमचं प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे भौतिक स्वरुप सत्यात उतरले आहे आणि ती दैवी आहे.’ तिने दुर्गामातेच्या नावावरुनच मुलीचे नावही देवी ठेवले आहे. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा याचं देवी हे पहिलीचं बाळ आहे. दोघे त्यांच्या 2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि पुढच्या वर्षी लग्नगाठ बांधली. बिपाशा आणि करणने मॅटर्निटी शूटमधील फोटो शेअर करत या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना बाळ असल्याची घोषणा केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम